अधिक सरावासाठी दिलेल्या वाक्यांची उत्तरे
A 1. How do you think he will manage this? 2. Do you think India will win this World Cup? 3. Do you think the writer has gone mad? 4. Do you think you are too wise? 5. Many people don’t know what exactly they want. 6. I couldn’t understand why he was angry. 7. Do you know where this road goes? 8. I can’t remember where I put your book.
9. I can’t remember where I put my key. 10. Can you tell me how much more time it will take? 11. Do you know in which direction the earth rotates? 12. Do you know if he is married? 13. Do you know if this road is right? 14. I don’t know if he understood this or not. 15. I will
अधिक सरावासाठी दिलेल्या वाक्यांची उत्तरे
give you a missed call when I finish my work. 16. It started raining when I was waiting for the bus. 17. You can live here when I am out. 18. After he was fired from the job, he started his own business.
19. I will wait outside till you finish your work. 20. We must do whatever we can. 21. Do whatever you like. 22. What I need at this moment is some more money. 23. I am sorry to say but what I need is not your advice. 24. What I mean to say is we should finish this job today. 25. What I am trying to say is we should be more careful. 26. Anyone will say what he did was wrong. 27. What I will do now is write down all this in my notebook. 28. What we can do now is just wait - that’s all. 29. I told what I thought. 30. I will do what I can.
31. This is what you think. 32. This is not what I think. 33. This is what he had asked. 34. This is what he needed. 35. One who leaves reaches. 36. One who thinks knows. 37. One who keeps doing wins. 38. One who quits loses. 39. One who stopped finished. 40. One who can’t laugh shouldn’t open a shop. 41. One who doesn’t think is a dead man. 42. The film I saw yesterday was very boring. 43. The book you gave me is very nice. 44. The advice he gave cost me dearly. 45. The boy who opened the door was wearing the blue dress. 46. The person who was driving lost control of his car and the accident happened. 47. The fruit you have brought don’t look fresh. 48. The person who sings songs is called a singer. 49. The people who don’t tell the truth can’t be believed. 50. What’s the name of that boy who shouted at you? 51. I have a friend who speaks many languages.
B 1. मी येथे काय करत आहे असं मी स्वतःला विचारलं. 2. आत जा आणि तू काय करू शकतोस ते बघ. 3. त्याला जे पाहिजे होतं ते मिळालं. 4. ही ती गोष्ट होती ज्याची त्याला सवय नव्हती किंवा कधी होऊ शकत नव्हती. 5. हा तुकडा घे आणि याचे तुला आवडेल ते बनव. 6. ज्यात तुझा विश्वास आहे ते तुला करायला पाहिजे. 7. तू जे सांगत आहेस त्याची नोंद केली जात आहे. 8. मला जे वाटतं ते म्हणजे त्यांनी तिची माफी मागितली पाहिजे. 9. तू करायला पाहिजे असलेल्या सर्व गोष्टी मी केल्या. 10. विसरण्याआधी ते कर. 11. जाण्याआधी तिने काही निरोप सोडला का? 12. मुले कशी शिकतात याबद्दल हे पुस्तक आहे. 13. तिने तिचे शिक्षण का सोडून दिले मला कळले नाही (कळत नाही). 14. जाऊन बघ तो कोणाशी बोलत आहे. 15. तो कुठे काम करतो मला माहीत आहे. 16. तो केव्हा कार्यालयात असतो आणि केव्हा बाहेर, कोणालाही माहीत नसतं. 17. तू कुठे गेला होतास आणि तुला इतका वेळ का लागला याचं मला आधी उत्तर दे. 18. तो कोणत्या शाळेत
अधिक सरावासाठी दिलेल्या वाक्यांची उत्तरे
शिकतो हे त्याला विचारायचं आपण विसरलो.
19. आजकाल तो कुठे राहतो याची आम्हाला कल्पना नाही. 20. आपण शाळेत किती रचना शिकल्या तुला आठवण आहे का? 21. मी तेथे उभ्या असलेल्या रखवालदाराला विचारलं की त्याचे साहेब केव्हा येतील. 22. त्या छोट्या मुलाने हे गणित कसे सोडवले मला अद्याप कळले नाही. 23. ते दुकान रविवारी उघडे असते का हे मला माहीत नाही. 24. ते कधी बदलेल का हे मला माहीत नाही. 25. आणि ते शक्य आहे का हे सुद्धा मला माहीत नाही. 26. त्याच्याकडे असलेलं काय आहे हे सुद्धा मला माहीत नाही. 27. ती येत नाहीये हे सांगण्यासाठी तिने फोनसुद्धा केला नाही. 28. घंटी वाजल्यावर तिने फोन उचलला. 29. शाळेत असताना मला इतिहास आवडायचा. 30. ते परतले जेथून ते आले होते. 31. तू मला यानंतर इस्पितळात केव्हा पाहिलंस आठवण कर. 32. आणि जेव्हा मी परत आलो तेथे कोणीही नव्हता. 33. मला वाटतं मोठा झाल्यावर मी डॉक्टर बनेन. 34. माझ्याकडे काहीही पर्याय नाही, मला दुसरी नोकरी मिळेपर्यंत येथे काम करावं लागेल.
35. खात्री होईपर्यंत त्याने काहीही म्हटलं नाही. 36. आपण करत असलेलं सगळं तुला कसं आठवण राहतं? 37. तू कोण आहेस तुला आठवण आहे का? 38. काल रात्री तू काय म्हणालास तुला आठवण आहे का? 39. शाळेला जाईपर्यंत त्याला मित्र नव्हते. 40. आम्ही खाली असेपर्यंत काहीही घडणार नाही. 41. जेवण करत असताना तू मला सांगेन असं म्हणालास एवढंच मला माहीत आहे. 42. तुम्ही घरी असताना किंवा घरून निघताना किंवा गाडीमध्ये असताना, पार्किंगच्या जागेत असताना, दुकानात असताना, बँकेच्या शाखेत असताना किंवा एटीएम्वर असताना, थोडक्यात तुम्ही जेथेही असाल तुमच्या मालकीच्या वस्तू घेण्याचा चोर प्रयत्न करू शकतो. 43. घरी परत येत असताना मी एक विचित्र आवाज ऐकला.
44. दारावरची घंटा वाजली तेव्हा मी अभ्यास करत होतो. 45. जेव्हा आम्ही बागेत बसलेलो होतो, अचानक जमीन हालायला लागली. 46. तिला जे विचारलं गेलं नाही ते ती कधीच सांगणार नाही. 47. त्याचसाठी तर ती येथे आली. 48. तिला माहीत होतं ती काय करत होती. 49. ती घरी आल्यावर त्याविषयी मी तिच्याशी बोलेन. 50. मोबाइलफोनमुळे तुम्ही कुठेही असाल तरी संपर्कात राहू शकता. 51. तो येईपर्यंत आम्ही सुरुवात करणार नाही. 52. सिग्नलला पोहोचेपर्यंत (वाहतुकीचे दिवे येईपर्यंत) जात रहा आणि (मग) उजवीकडे वळ. 53. जेव्हाही ती येते, सोबत मैत्रिण आणते. 54. जेव्हाही शक्य असेल आम्ही मदत करण्याचा प्रयत्न करतो. 55. तो जे काही करतो त्यात तो चांगला आहे. 56. तू जो कोणी असशील तेथून बाहेर ये. 57. मी लहान असताना वेगळं होतं.